सासवड येथून मालकाचे पैस घेवून कामगार पळाला पोलीसांनी नांदेडमधून अटक केला



सासवड पोलिसांची कारवाई : ६० हजार रुपये घेऊन पळाला होता 

 सोनोरी रस्त्यावरील एका वीटभट्टी मालकाने रोख रक्कम ६० हजार रुपये एका व्यक्तीस देण्यासाठी कामगाराला सांगितले. पैसे घरात ठेवून काही कामानिमित्त मालक बाहेर गेले. मात्र पुन्हा आल्यानंतर ठेवलेले पैसे संबंधित व्यक्तीस न देता परस्पर घेवून पोबारा केला. दरम्यान कामगार पैसे घेवून
 पळून गेल्याच्या ठिकाणाची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी नांदेड जिल्ह्यात त्याच्या शेतात जाऊन

अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.

मधुकर केरबा नामावाड (रा. मरखेल, जि. नांदेड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विवेक संजय कुंभार (रा. सासवड) येथील फिर्याद दिली होती. फिर्यादी

 विवेक कुंभार यांची सासवड सोनोरी रस्त्यावर वीटभट्टी असून तिथे मधुकर केरबा नामावाड हा कामाला होता. दि. ३ मे रोजी फिर्यादी विवेक कुंभार यांनी मधुकर नामावाड यास सुदर्शन जाधव

यांना मातीचे ६० हजार रुपये द्यायचे होते. परंतु त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांना बाहेर जायचे होते.

 त्यामुळे विटभट्टीचे ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले

 सुदर्शन जाधव यांना देण्यास सांगून ते बाहेर निघून गेले.

दरम्यान सायंकाळी कामगार मधुकर नामावाड हा ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६० हजार रूपये तो रोकड घेऊन कुटुंबासह पळून गेला होता. सासवड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला