सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांची वार्षिक निरीक्षण अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग सासवड येथे. नागरीक भेट व सुसंवाद मेळावा

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांचे पुणे ग्रामीण दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, सासवड कार्यालयाचा वार्षिक निरीक्षण नियोजीत कार्यक्रम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भोर विभाग सासवड याठिकाणी नागरीक भेट व सुसंवाद मेळावा पार पडला

वार्षिक निरीक्षण अनुषंगाने   सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग, सासवड येथे भेट दिली

सदर निरीक्षणादरम्यान  पंकज देशमुख पोलीस अधिक्षक  पुणे ग्रामीण  रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, तसेच उपविभागातील सासवड, जेजुरी, भोर, राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकारी है उपस्थित होते. निरीक्षणावेळी  विशेष पोलीस महानिरीक्षक  कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांना मानवंदना देण्यात आली.

आगामी काळात येणारे सण-उत्सव, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने तयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागातील गुन्हे उकल दोषसिध्दी, मुद्देमाल निर्गती, एन.डी.पी. एस गुन्हे यासारख्या महत्वाचे मुद्दे यांचेवर  विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांनी उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच दुय्यम पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती घेतल्या

त्यानंतर मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांशी थेट संवाद साधला. सदर वेळी नागरीकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगता दरम्यान नागरीकांनी  विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबददल शुभेच्छा देवुन सत्कार करण्यात आला.

विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यावेळी बोलताना म्हणाले की, आम्ही लोकसेवक आहोत, जनतेच्या सेवेसाठी आहोत. प्रत्येक जिल्हयात गेल्यानंतर नागरीकांची भेट घेवुन त्यांच्या अडी अडचणी स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी निर्भया पथकामुळे शालेय विदयार्थ्यांना योग्य मदत होत आहे. तसेच हददीत दाखल होणाऱ्या गुन्हयांचे तपास, त्यात मिळालेले मुददेमाल परत करणे, तसेच ठराविक मुददेमालांची कायदेशिर विल्हेवाट लावण्यात येत आहे. सदर बाबत शासनाकडून शासकीय कार्यालयांचे मुल्यमापन करण्यात येत आहे. त्यानंतर मनोगत व्यक्त कारणाऱ्या

नागरीकांचे आभार मानले  या भेटीमधुन जनता व पोलीसांमध्ये सुसंवाद राहुन त्यांच्यामधील नाते दृढ होण्यास मदत होत आहे

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला