सासवड येथे अनोळखी इसामाचा आढळला मृतदेह पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड येथे अनोळखी इसामाचा आढळला मृतदेह पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, मयत अवस्थेत राजवाडा हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला पडलेले मिळून आलेले आहे. अज्ञात वाहन चालकाने ठोस देऊन अपघात करून गंभीर दुखापत करून सदर इसमाचे मरणास कारणीभूत झाला आहे. सदर व्यक्ती भंगार गोळा करणारी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे तिचे वर्णन खालील प्रमाणे असून सदर व्यक्ती आपले ओळखीचे असल्यास सासवड पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी.
मयताचे वर्णन - एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे 25 ते 30 रंग गोरा केस काळे कुरळे नाक सरळ उंची 5. 3 इंच अंगावर चॉकलेटी रंगाचा फुल बायाचा शर्ट काळे रंगाची जीन्स पॅन्ट डाव्या पायास मांडीवर व मांडीचे पोटरीवर जुने जखमेचा व्रण आहेत कोणाला काही माहिती असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा
संपर्क क्रमांक -
सासवड पोलीस स्टेशन 02115/222333
ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड 9552747480
लियाकतअली मुजावर पोलीस हवालदार सासवड पोलीस स्टेशन 9823761566