ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सासवड पोलिसांना अवैद्य धंदे बंद करून कारवाई करण्याचे आदेश देऊन ही सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदे खुलेआम सुरूच...

 

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत याबाबत  

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने, उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले हे सोमवार दि. २१ / ४ / २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजे पासून  बेमुदत उपोषणास बसणार आहेत, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी

 ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे पुरंदर तालुका अध्यक्ष कालीदास उबाळे व कार्याध्यक्ष सुधीर शेलार यांनी दिली, 
       सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत व इतर विषया बाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांनी दि. १० / २ / २०२५ रोजी सासवड पोलीस स्टेशन येथे टाळनाद

 आंदोलन केले होते, यावेळी  बहुजन हक्क परिषद काॅंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व विविध सामाजिक संघटनेने या आंदोलनास जाहीर पाठींबा दिला होता, यावेळी सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदे बंद करण्यात येतील असे आश्वासन देऊनही  ते पाळले गेले नाही
 
     काही दिवसांपूर्वी सासवड पोलीस स्टेशनला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी व

 ग्रामीण पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी भेट दिली असता  पत्रकार काही पोलीस पाटील व नागरीक यांनी अवैद्य धंद्याबाबत  आपली स्पष्ट भूमिका मांडली होती, परंतु त्यानंतर अवैद्य धंदे बंद करण्यात आले नाहीत, अवैद्य धंदे बंद करण्यास सासवड पोलीस स्टेशन हतबल दिसून येत आहे. त्यामुळे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश

 सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख , उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे,व सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन, सोमवार दि २१ / ४ / २०२५ रोजी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय

 घेतला आहे, या आंदोलनास विविध पक्ष संघटनेच्या

 पदाधिकाऱ्यांनी सक्रिय पाठिंबा द्यावा असे आवाहनही कालीदास उबाळे व सुधीर शेलार यांनी केले आहे,

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला