सासवड शहरातील अवैध धंदे रोखण्यास पोलिसांना अपयश अवैद्य धंदे कायमचे बंद करण्यासाठी उपमुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींना विष्णू दादा भोसले यांचे खुले पत्र
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत यासाठी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, व पुरंदर हवेलीचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार विजय शिवतारे, यांना
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी सोशल मिडीयाद्वारे खुलेपत्र लिहून पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यासाठी साकडे घातले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार व लोकप्रतिनिधी यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे क
अवैद्य धंद्यातुन पैसा पैशातुन भाईगिरी ,भाईगिरी तुन गुंडगिरी यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यात , आज अवैद्य धंद्याचा सुळसुळाट सुरु आहे, अनाधिकृतपणे मद्यविक्री यामध्ये देशी विदेशी, हातभट्टी
गांजा , जुगार मटका देहविक्री चक्री अशा प्रकारचे अवैद्य धंदे खुलेआम लोकवस्तीत राजरोसपणे सुरू आहेत याबाबत
नागरीक तक्रार देण्याचा प्रयत्न करतात, परंतु कुंपणच शेत खात असेल किंवा रखवालदार जर चोराच्या भूमीकेत असेल तर काय करायचे, हा गंभीर प्रश्न आहे. पोलीस स्टेशनला
तक्रार दिली की, तक्रार देणा -या व्यक्तीचे नाव काही क्षणात अवैद्य धंदा करणा-याला कळतंय इतकी प्रबळ
गुप्तहेर यंत्रणा आणि हेरखाते सज्ज असलेले पाहण्यास मिळत आहे, उद्याचे देशाचे भवितव्य ज्यांच्या हाती आहे, ते तरुण व्यसनाधीन होताना दिसत आहे, तरुणांचा कल अवैद्य धंद्याकडे वळताना दिसत आहे, त्यामुळे पुरंदची ऐतिहासिक ओळख पुसली जाऊन, अवैद्य धंद्याची व गुंडगिरीची पंढरी म्हणून गौरवशाली इतिहास असलेल्या पुरंदरची ओळख निर्माण होईल की काय, अशी शंका येऊ लागली आहे, अवैद्य धंद्यावर अंकुश ठेवण्यास सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हातबल असलेले दिसून येत आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयाच्या
हाकेच्या अंतरावर अवैद्य धंदा राजरोसपणे सुरु आहे, अवैद्य धंदे करणाराची नावे ,ठिकाण, प्रमुख अधिकारी यांना देऊन देखील कार्यवाही होत नाही, मध्यांतरी तत्कालीन पोलीस अधिक्षक साहेब यांनी व्हाॅट्स अप नंबर देऊन, यावर अवैद्य धंद्याची माहीती द्या, माहिती देणा -याचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि अवैद्य धंद्यावर कारवाई केली जाईल असे जाहीर केले होते त्यानुसार सदर नंबरवर माहिती देऊन , मा. उपविभागीय अधिकारी भोर विभाग यांना प्रत्येक्ष भेटून , पोलीस निरीक्षक साहेब सासवड पोलीस स्टेशन यांना प्रत्येक्ष भेटून अवैद्य धंदे कोठे चालू आहेत, ते कोण करतात याची नावे देऊन देखील कार्यवाही होत नाही, त्यामुळे
अवैद्य धंदे करणा-या प्रवृतीला नक्की कोणाचे पाटबळ आहे. यांचा पोशिंदा कोण आहे, हा प्रश्न निर्माण झाला
आहे, दि. १० / २ / २०२५ रोजी मी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने सासवड पोलीस स्टेशन समोर जाहीर टाळनाद आंदोलन केले, दि. २१ / ४ / २०२५ रोजी अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत यासाठी मी विष्णूदादा भोसले, बळीराम सोनवणे आणि कालीदास उबाळे आम्ही मा.उपविभागीय अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलो यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे साहेब होम डि.वाय एस पी साहेब आणि सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी साहेब व उपोषण कर्ते रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी कदम साहेब, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक
झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे साहेब यांनी पंधरा दिवसांची मुदत द्या सर्व अवैद्य धंदे बंद करु असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते, परंतु दि. १० / २ / २०२५ ते आजतागायत एकाही धंद्यावर कारवाई करण्यात आली नाही, किंवा मा. डि.वाय. एस पी साहेब किंवा पी आय साहेब यांना व्हाॅट्स अप नंबरवर व प्रत्येक्ष भेटून दिलेल्या माहितीनुसार एका देखील अवैद्य धंदा करणा-या व्यक्तीवर कार्यवाही झाली नाही .त्यामुळे पोलीस प्रशासन अवैद्य धंदे रोखण्यास हातबल आहेत की, पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव
आहे हा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे , पुरंदर तालुक्याच्या गौरवशाली इतिहासाची ओळख पुसली जाऊ नये, व दहशत मुक्त व अवैद्य धंदे मुक्त पुरंदर करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पुरंदर तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य ते प्रयत्न करावेत , असे साकडे घातले आहे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व विविध सामाजिक व राजकीय पक्षाच्या पाठींब्यावर अवैद्य धंदे बंद करण्यासाठी तिव्र आंदोलन करावे लागेल , असा इशाराही सदर खुल्या पत्रात विष्णुदादा भोसले यांनी दिला आहे.