सासवड येथे ईद-उल-अझा तथा बकरी ईद सामूहिक नमाज पठण करून उत्साहात साजरी
मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी (दि.७ जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातीत कुंजीर वाडा येथे सकाळी ८:३० वाजता ईदची नमाज मौलाना शमशेद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
यावेळी सासवड शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. देशात
शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली ईदनिमित्त नमाज पठण पावसाच्या
वातावरणामुळे ईदगाह मैदान येथे न होता सासवड येथील कुंजीरवाडा टाऊन हॉल येथे झाले मुस्लिम बांधवांनी
एकमेकांच्या भेटी-गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या
पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून सासवड शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता