बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला
प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज : बाल विकास मंदिर शाळेत योगदिन उत्साहात साजरा
सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल
विकास मंदिर सासवड जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी शक्तीची देवता मारुतीरायाच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच सूर्यनमस्कार आणि योगासनाचे फायदे आपल्या प्रास्ताविकातून
विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि
विविध योग प्रात्यक्षिक सादर केले. यापुढे रोज सूर्यनमस्कार, योगा करण्याचा संकल्प यावेळी केला. या सर्व विद्यार्थ्यांना माणिक शेंडकर , नरेंद्र महाजन, अश्विनी कदम
यांनी मार्गदर्शन केले.
मीना खोमणे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाची माहिती दिली. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी, क्रीडा शिक्षक दीपक कांदळकर,नितीन ठोंबरे , सर्व
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.