चहाचे वाटप अन् आपुलकीची वीचारपुस! सासवड शहरातील मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचे स्वागत...

सासवड (ता. पुरंदर)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा  दिनांक २१ जून रोजी सायंकाळी सासवड नगरीत भक्तिभावात दाखल झाला. पालखीच्या स्वागतार्थ विविध सेवाभावी संस्था पुढे

 सरसावल्या असून  सासवड शहरातील मुस्लिम बांधवां तर्फे जयप्रकाश चौक  सासवड येथे वारकऱ्यांना चहा  वाटप करण्यात आले

 या सेवाकार्यात आरीफ आतार मा.नगरसेवक हारुन बागवान शाकीर काजी जुबेर काजी अनस अरबाज आतार सोहेल आतार 

 अनस काझी,साजीद तांबोळी, हाजी बबलू तांबोळी, सद्दाम शेख मोईन शेख, फारुख तांबोळी हमजा तांबोळी एडवोकेट गालीब इनामदार  यांनी विशेष मेहनत घेतली.

सासवड शहरातील मुस्लिम बांधवांनी  सांगितले की पालखी सोहळा म्हणजे केवळ श्रद्धेचा उत्सव नाही, तर सेवाभाव

 जोपासण्याची संधी आहे. वारकऱ्यांची ही सेवा करताना समाधान मिळाले

सासवडमध्ये दोन दिवसांचा माउलींचा मुक्काम असताना

 अशा सेवाभावी उपक्रमांमुळे सासवडचे वातावरण अधिक मंगलमय झाले होते

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला