श्री संत सोपानदेव पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण सोमवारी होणार पंढरपूरकडे प्रस्थान
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : संत सोपानदेव पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी २२ रोजी दिवे घाटातून सासवड मध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आगमन होत आहे. तर सोमवारी जेष्ठ वद्य द्वादशीला संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे क्षेत्र पंढरपूर कडे
सकाळी ११ वाजता टाळ मृदुंगाचा जयघोष प्रस्थान होत आहे. यानिमित्त संत सोपानदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे.
सोहळ्यात संत सोपानदेव महाराज यांच्या पादुका ठेवण्यात येणाऱ्या पालखीला झळाळी देण्यात आली असून रथालाही स्वच्छ करून मुलामा देवून झळाळी देण्यात आली आहे. यंदा सोहळ्यात ११३ दिंड्या असल्याची माहिती देवस्थानचे
मुख्य विश्वस्त ॲड. त्रिगुण गोसावी यांनी दिली. दरम्यान यंदा वारीत स्वच्छ वारी, निर्मल वारी हा उपक्रम राहाविण्यात येणार असून रस्त्यावर कुठेही कोणताही वारकरी कचरा टाकणार नाही याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पालखी सोहळ्यासाठी अंजनगाव येथील अजित परकाळे
यांचा मानाचा अश्व सासवडला दाखल झाला असून सुहास निबंधे, मधुकाका गोसावी, चोपदार श्रीहरी शिंदे, सुधाभाऊ गिरमे, बापूसाहेब परकाळे यांच्या उपस्थितीत अश्वाचे पूजन
झाले आहे. रथाच्या बैल जोडीचा मान सोरटेवाडी येथील केंजळे परिवाराकडे आहे. तर नगाराची बैलजोडी निरा येथील कुलकर्णी परिवाराची आहे.
दरम्यान द्वादशीला प्रस्थानाच्या आधी देवस्थानच्या वतीने
पादुकांची महापूजा होईल. त्यानंतर सुवासिनींच्या हस्ते पादुकांना औक्षण करण्यात करण्यात येईल. त्यानंतर मंदिराचे वहिवाटदार गोसावी मंडळी यांच्या वतीने सोपानदेवांच्या पादुका केंजळींच्या हाती सुपूर्द करण्यात
येतील. तसेच केंजळे मंडळी या पादुका पालखीत नेऊन ठेवतील. त्यानंतर सर्व मानक-यांना नारळ प्रसाद देऊन पालखीचे प्रस्थान सुरु होईल. अशी माहिती श्रीकांत गोसावी व पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट त्रिगुण महाराज गोसावी
यांनी दिली. व्यवस्थापक हिरुकाका गोसावी, चोपदार सिद्धेश शिंदे, हभप अभय जगताप आदी यावेळी उपस्थित होते