विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : पर्यावरण जनजागृती व वृक्ष

 संवर्धनाचा संदेश देत सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत आषाढी एकादशी

 निमित्त वृक्षदिंडी व पालखी सोहळा उत्साहात पार पडला. 
यावेळी सर्व विद्यार्थी वारकरी पोशाख परिधान करून शाळेत उपस्थित होते.  गळ्यात टाळ  खांद्यावर भगवी पताका

 मुलींच्या डोक्यावर तुळस घेऊन बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी, शिक्षक  आनंदाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी या

 दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरले.
 विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात राम कृष्ण हरी  ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या नावाचा जयघोष केला. शाळेचे मुख्याध्यापक  भाऊसाहेब बडधे, मंजुषा चोरामले  यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांचे तसेच पालखीचे

 पूजन करून आरती केली. शाळेच्या परिसरातील पालखी मिरवणूक आणि ' ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराजांच्या

 जयघोषाने शाळेचा संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला. नरेंद्र महाजन यांनी भजन, अभंग यांचे गायन केले.  यावेळी मुख्याध्यापक   भाऊसाहेब बडधे यांच्यासह सर्व शिक्षक 


 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन माधुरी जगताप अश्विनी कदम,  राजगौरी जगताप

 यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केले. या उपक्रमाचे शाला समितीचे अध्यक्ष ॲड सागर नेवसे  महामात्र प्रा.  सुधीर भोसले यांनी कौतुक केले.

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला