भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद
क्राईम न्यूज: द. महाराष्ट्र न्यूज दि. २७/०६/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहित नाही) यवत ता. दौड जि. पुणे गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन एक अनोळखी इसम, यय अंदाजे ३० ते ३५ वर्षे (नाय व पत्ता माहित नाही.) यास तीव्र धारदार अज्ञात हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावरती, उजव्या छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने कोणत्यातरी अज्ञात ज्यवालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्याम पेटवून देवून जीवे ठार मारले आहे. म्हणुन फिर्यादी नामे पो. हवा विनायक हाके यांनी सरकारतर्फ अज्ञात आरोपीविरुध्य यवत पोलीस स्टेशन येथे दि. २७/०६/२०२५ गेजी कायदेशीर तक्रार दिली होती.
तरी दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने तांत्रिक माहिती आधार विश्लेषण करून तसेच इतर जिल्ह्यातील दाखल मानव मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव येथील मानव मिसिंग रजिस्टर क्रमांक २२/२०२५ अन्यये दाखल मिसिंग मधील मिसिंग नामे लखन किसनराव सलगर वय २४ वर्षे, रा. टाकळी ढोफी ता. जि. धाराशिव हा मदर गुन्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्याचा अधिक तपास केला असता इसम नामे १) योगेश दादा पडळकर, यय २५ वर्षे २) राजश्री योगेश पडळकर, वय २३ वर्ष दोघे ग. माळशिरस ता. पुरंदर जि. पूर्ण ३) विकास आश्रुबा कोरडे, वय २१ वर्ष ग. आनंदवाडी टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव ४) शुभम उमेश वाघमोडे, वय २२ वर्षे, रा. मुरुड ता. जि. लातूर ५) काकासाहेब कालिदास मोटे ४२ वर्ष गाव येवती ता. जि. धाराशिव यांनी संगनमताने कट रचून इसम नाम लखन किसनराव सलगर यास तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावस्ती, उजवे छानीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवून जीवे ठार मास्ले असल्याचे कबुल केले आहे. तरी सदर गुन्हयातील निष्पन्न झालेल्या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी दि. ११/०७/२०२५ ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशान्यचे सपोनि महेश माने हे करित आहेत.
सदरची कारवाई ही संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक, बारामती. बापुराव दडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड. यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि राहूल गावडे (स्थानिक गुन्हे शाखा). पो.नि महेश माने, पो.नि. प्रविण संपांग, पोलीस उपनिरीक्षक मागेती मतलवाड फौजदार सचिन घाडगे (स्था.गु शा), पो. हवा. मोमीन शेख पो. हवा. अजित भुजबळ पो. हवा. अजय घुले पो. कॉ. धिरज जाधव (स्था.गु.शा), पो. हवा. संदीप देवकर, पो. हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पी. हवा. विकास कापरे, पो. हवा. दत्ता काळे, पो. हवा. महेंद्र चांदणे, पो. हवा. रामदास जगताप, पो. हवा. नारायण चलेकर, पो. हवा. गणेश कर्चे सुनिल नगरे, पो. हवा. विनायक हाके, पो. हवा. संतोष कदम, पो. हवा. प्रमोद गायकवाड, पो. ह.वा, परशुराम म्हस्के पो. हवा. प्रमोद शिंदे, पो. हवा. वैभव भापकर, पो.कॉ. मारूती बागते, पी. कॉ. विनोद काळे, पो. कॉ. दिपक येनाळ, पो. कॉ. प्रणय ननवरे, पी. कॉ. प्रतिक गरूड, पो. कॉ. शुभम मुळे पो. कॉ. सचिन काळे, पो. कॉ. मोहन भानवसे म.पो.कॉ. स्वप्नाली टिवळे यांचे पथकाने केली आहे.