सासवड येथील वाघीरे महाविद्यालय समोर गतीरोधक बसण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेणार का? मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास..
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास सासवड येथील वाघीरे विद्यालय समोर गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे हा रस्ता सासवड हिवरे रोड येथून
बापदेव घाट मार्गे पुण्याकडे जातो या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने धावतात याच रस्त्याच्या कडेला शाळा आहे या रस्त्यावरून शाळेतील विद्यार्थी पालक ज्येष्ठ नागरिक
ये.जा. करतात तिथे अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतेही सुरक्षा फलक गतिरोधक बसविल्यानमुळे शाळेतील
विद्यार्थ्यांना जीव मुठीत घालून शाळेत जावे लागत आहे या धोकादायक रस्त्यावरून एखादा नाहक बळी गेला तर याला
जबाबदार कोण? आता सार्वजनिक बांधकाम विभाग या
रस्त्यावर सुरक्षा फलक गतीरोधक बसणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे