सासवड पोलिस ॲक्शन मोड मध्ये मटक्याच्या अड्ड्यावर धाड सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे चालू देणार नाही पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी
क्राईम न्यूज: सासवड पोलिसांची मटक्याच्या अड्ड्यावर कारवाई याबाबत फिर्यादी - सागर सावता कोरडे पोलीस कॉन्स्टेबल सासवड पोलीस स्टेशन यांनी
विजय वसंत जाधव वय - 36 वर्षे, यशराज हॉटेल लांडगेआळी सासवड ता.पुरंदर,जि.पुणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सासवड पो.स्टे. यांनी पोलीस कॉन्स्टेबल कोरडे पो.हवा लडकत यांना बोलावून कळविले की, माझे गुप्त बातमी दारामार्फत मला बातमी मिळाली सासवड गांवचे हदिदत पी.एम.टी.स्टॉप
शेजारील मगर बेकरीचे मागे एका पत्र्याचे शेडमध्ये एक इसम मेन बाजार नावाचा मटका जुगार लोकाकडून पैसे घेवून खेळवीत आहे. अषी खात्रीषीर बातमीदारामार्फत बातमी मिळाली असुन सदर ठिकाणी जावुन छापा टाका. असे कळविले वरून पो.हवा.लडकत यांनी लागलीच दोन पंचांना बोलावुन मिळाले बातमीचा आषय कळवून पंचांना
सदर ठिकाणी छापा टाकुन सदर ठिकाणचा पंचनामा करावयाचा आहे. असे कळविले वरून पंच तयार झाले नंतर पोलीस कॉन्स्टेबल कोरडे पो.हवा.लडकत हे खाजगी वाहनाने रवाना होवुन मिळाले बातमीचे अलीकडे गाडी थांबवुन बातमी प्रामणे जावुन खात्री केली असता एक इसम त्याचेकडील एका कागदावरती आकडे लिहुन
लोकांकडुन पैसे घेत असताना दिसुन आला. आम्ही त्यांचेकडे जात असताना त्यंाना आमचा संशय आल्याने तेथील लोक आम्हाला पाहून इकडे तिकडे पळून गेले. आम्ही त्यातील आकडे लावणरे इसमास पकडुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विजय वसंत जाधव वय - 36 वर्षे, यशराज हॉटेल लांडगेआळी सासवड ता.पुरंदर,जि.पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचे कब्जात
खालील वस्तु आढळून आल्या..
1) 00-00 एक मेन बाजार नावाचा कागद त्यावरती नंबर 1681 ते 1690 नंबर वरती आकडे मोड
केलेली. व एक कारबन पेपर,
2) 610/- रू.रोख रक्कम त्यामधे 100/-रू दराची 1 नोट, 50/- रू दाराच्या 8 नोटा, 20/- रू
दाराच्या 5 नोटा, 10/-रू दराची 1 नोट
610/-येणेप्रमाणे रोख रक्कम व जुगाराची साधने इसम नामे विजय वसंत जाधव वय - 36 वर्षे
रा.यशराज हॉटेल लांडगेआळी सासवड ता.पुरंदर,जि.पुणे याचेकडे मिळून आली ती पो.हवा.लडकत यांनी दोन पंचाचे समक्ष एका खाकी लिफाफयामध्ये पॅक करून त्यावर
पो.हवा.लडकत व पंचाचे सहयाची सिले लेबले करून जप्त करण्यात आली. सदर व्यवसायाचे मालकाबबात विचारणा करता त्यानी सांगितले की सदरचा व्यवसाय हा माझा
स्वतःचा आहे. छापा घातला. ती वेळ 21ः15 वा.ची होती विजय वसंत जाधव वय - 36 वर्षे, रा.यषराज हॉटेल लांडगेआळी सासवड ता.पुरंदर,जि.पुणे याचे विरूद्व महाराष्ट्र
जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद आहे सदरचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
पो हवा शिंदे करीत आहेत