सासवड शहरात अपघात ग्रस्त क्षेत्रामध्ये गतीरोधक सिग्नल सीसीटीव्ही तातडीने बसवण्यात यावेत याकरिता भाजपाचे प्रशासनाला निवेदन..

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड शहरात अपघात ग्रस्त क्षेत्रामध्ये गतीरोधक सिग्नल सीसीटीव्ही बसवण्यात यावेत याकरिता भाजपाचे प्रशासनाला निवेदन

 भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने  सासवड शहरातील अपघातग्रस्त क्षेत्रांबाबत उपाययोजना राबवण्यासाठी, तसेच शहरात सिग्नल बसवण्याबाबत यावेत

 तहसील कार्यालयातील जुन्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगदरम्यान गहाळ होण्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली.

या संदर्भात, भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन यांना अपघातग्रस्त क्षेत्रांबाबत उपाययोजना राबवण्याची

 विनंती करण्यात आली. तसेच, सासवड शहरात रस्ते

 सुरक्षिततेसाठी  तातडीने सिग्नल बसवण्याबाबत यावेत अशी मागणी मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण सासवड नगरपरिषद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय
 तहसील कार्यालयात जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करताना होणारी गहाळ होण्याची समस्या रोखण्यासाठी    तहसील कार्यालयात  निवेदन देण्यात आले

यावेळी भारतीय जनता पार्टी, सासवड शहराचे अध्यक्ष  आनंद जगताप, मा.उपनगराध्यक्ष  अजित जगताप भाजपा


 राज्य परिषद सदस्य शैलेशजी तांदळे, मध्य हवेली अध्यक्ष  धनंजय कामठे,  मयूर जगताप   जयेंद्र निकम,  संतोष

 जगताप, तुषार जगताप,  राहुल भोंडे, उदयराज जगताप   ओंकार महागांवकर मयूर महागांवकर आदि उपस्थित होते.

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला