सासवड शहरात वाढले अवैद्य व्यवसाय अवैद्य धंद्यामुळे अनेकांचे कुटुंब होत आहेत उध्वस्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णू दादा भोसले बेमुदत आंदोलन करणार....
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: अवैद्य धंद्याच्या विरोधात सासवड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर रिपाइंचे आंदोलन करणार
लेखी आश्वासन देऊनही अवैद्य धंदे बंद झाले नाहीत
पुरंदर तालुक्यातील जेजुरी व सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे चालू आसणारे अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत या मागणीसाठी सोमवार दि. १४ / ७ / २०२५ रोजी उपविभागीय पोलीस
अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे,
याबाबतचे लेखी निवेदन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार बारामती लोकसभा
मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी माजीमंत्री विजय शिवतारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गील उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड
तानाजी बरडे, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे व राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाचे निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे,
सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत भर लोकवस्तीत अवैद्य मद्यविक्री, हातभट्टी दारु जुगार चक्री,मटका ऑनलाईन मटका गांजा गुटका हाॅटेल ढाब्यावर
अनाधिकृतपणे मद्यविक्री या प्रकारचे अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू आहेत, याबाबत सासवड पोलीस स्टेशन समोर व उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करुनही व उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांनी
उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड व सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना अवैद्य धंदे करणारांची नावे देऊन , व तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या नंबरवर तक्रार करुन देखील अवैद्य धंदे बंद केले जात नाही, सासवड शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे परंतु ते असून नसल्यासारखे आहे, त्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला जागे
करण्यासाठी व सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी
उपविभागीय अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या व श्रमिक ब्रिगेडच्या वतीने सोमवार दि.१४ / ७ / २०२५ पासून रोज सकाळी
ठीक ११ ते सायंकाळी ५ पर्यंत जागर गोंधळ ढोल ताशा, संबळ वादन, धरणे आंदोलन यापैकी एक बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे असेही निवेदनात म्हटले आहे