सासवड येथे बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी निमित्त पावनखिंड दौड ...
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे बालविकास मंदिर तसेच इंग्लिश मीडियम स्कूल आणि म. ए. सो. क्रीडावर्धिनी, पुणे यांच्या
संयुक्त विद्यमाने वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त सासवड शहरातून पावनखिंड दौडचे आयोजन केले होते.
सासवड शहरातून अमर चौक मुख्य बाजारपेठ शिवतीर्थ चौक या मार्गाने पावनखिंड जवळ आयोजित केली होती
सासवड येथील शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरीला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचा शेवट शाळेत व्याख्यानाने झाला.
सासवड येथील शिवव्याख्याते कुंडलिक पाटोळे यांचे व्याख्यान यावेळी आयोजित केले होते. पाटोळे यांनी आपल्या व्याख्यानात वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी केलेल्या पराक्रमाच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या
ओघवत्या शैलीतून त्यांनी बाजीप्रभू यांचा पराक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उभा केला.
यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, कल्पना नागनूर - खांडेकर , पर्यवेक्षिका सरोज बाला , क्रीडाशिक्षक दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक
भाऊसाहेब बडधे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नरेंद्र महाजन यांनी करून दिला. सूत्रसंचालन माणिक शेंडकर
यांनी केले. आभार भाऊसाहेब येळे यांनी मानले.