पुरंदर तालुक्यातील या गावात सख्या भावानेच केला सख्या भावाचा खून

क्राईम न्यूज :     पुरंदर तालुक्यातील या गावात सख्या भावानेच केला सख्या भावाचा खून केला आहे 


जेजुरी पोलीस स्टेशन हदीत सख्या भावाने केलाच सख्या भावाचा खुन जेजुरी पोलीसानी केला खुनाचा 24 तासात उलघडा

दि. 01/8/2025 रोजीचे सकाळचे सुमारास इसम नामे ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय 82 वर्षे रा मावळी.क.प ता. पुरंदर जि.पुणे याचे मयत मौजे मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे गावचे हदीत दाजीरचे शेतात बाजरीचे पिकात मिळुन
 आलेबाबत नातेवाईकांनी खबर दिली होती. त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टरी नोद करणेत आली होती.

दाखल मयताचे तपासामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय 82 वर्षे रा मावडी.क.प ता. पुरंदर जि.पुणे यांचा व त्याचा सख्खा लहान भाऊ नामे चांगदेव लक्ष्मण भामे यांचेत

 जमीनीतील रस्त्यावरून वाद होता. त्याअनुशंगाने तात्काळ चांगदेव लक्ष्मण भामे वय 68 वर्षे रा मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे यास तपासकामी ताब्यात घेवुन चौकशी केली. परंतु


 सुरूवातीस त्यांने झाले प्रकाराबाबत सांगणेस नकार दिला. परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखविलेनंतर त्यांने त्याचा सख्खा मोटा भाउ ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय 82 वर्षे रा


 मावडी.क.प ता. पुरंदर जि.पुणे याने जमीनीत जाणेसाठी रस्ता आडवित असलेने व त्रास देत असलेने त्यास हाताने लाथा बुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यामध्ये मयताचे डोकीत मारहाण केलेचे सांगितले. तसेच वैदयकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय जेजुरी यांनी देखील पोस्ट मार्टेम करता मयताचे डोकीस गंभीर जखम झालेचे सांगितले

 त्यावरून ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय 82 वर्षे रा मावडी.क.प ता. पुरंदर जि.पुणे याचा त्याचा सख्खा लहान भाउ चांगदेव लक्ष्मण भामे वय 68 रा. मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे यांनेच जमीनीचे रस्त्याच्या वादाचे कारणावरून खुन केलेचे उघड झाले असुन, आरोपी चांगदेव लक्ष्मण भामे वय 68 रा. मावडी क.प ता.पुरंदर जि. पुणे यास सदर गुन्हयाचे कामी

 दिनांक 2/8/2025 रोजी रात्री अटक करणेत आली आहे 

सदर कारवाई  संदीपसिह गिल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण गणेश बिराजदार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती, तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड, याचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशन दिपक वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक जेजुरी पोलीस स्टेशन महेश पाटील, पोलीस


 उपनिरीक्षक, नामदेव तारडे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी पोलीस उपनिरीक्षक  दशरथ बनसोडे पो.हवा.

 विठठल कदम पो.हवा. मुनीर मुजावर पो. हवा. संदीप भापकर  हेमंत भोंगळे पोलीस कॉन्स्टेबल याचे पथकाने
 केली असुन, सदर गुन्हयाचा पुढील तपास महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहे.

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला