सासवडला कोहिनूर फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना खिचडी व पाणी वाटप

सासवडमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनप्रसंगी कोहिनूर फाउंडेशनकडून खिचडी व पाण्याचे वाटप

सासवड (ता. पुरंदर)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा काल दिनांक २१ जून रोजी सायंकाळी सासवड नगरीत भक्तिभावात

 दाखल झाला. पालखीच्या स्वागतार्थ विविध सेवाभावी

 संस्था पुढे सरसावल्या असून कोहिनूर फाउंडेशन तर्फे शिवतीर्थ चौक, सासवड येथे वारकऱ्यांना खिचडी महाप्रसाद व पाण्याचे वाटप करण्यात आले

या उपक्रमात हजारो वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सासवडमध्ये उष्मा आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे वाटप वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरला या सेवाकार्यात रिया खेडेकर व रिजवाना आतार शाहीन शेख सिकंदर शेख

 रुपाली इंगळे यांनी विशेष मेहनत घेतली

कोहिनूर फाउंडेशन ने सांगितले की पालखी सोहळा म्हणजे केवळ श्रद्धेचा उत्सव नाही तर सेवाभाव जोपासण्याची संधी आहे वारकऱ्यांची ही सेवा करताना समाधान मिळाले

सासवडमध्ये दोन दिवसांचा माउलींचा मुक्काम असताना अशा सेवाभावी उपक्रमांमुळे सासवडचे वातावरण अधिक मंगलमय झाले आहे

Popular posts from this blog

भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा पाच आरोपी जेरबंद

विठ्ठल नामाची शाळा भरली! सासवडच्या बालविकास मंदिर शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन....

बाल विकास मंदिर शाळेत जागतिक योगदीन साजरा करण्यात आला