कीर्तनातून पर्यावरण रक्षणाचा संदेश पूनम महाराज जाचक प्रत्येक कीर्तनात पाच झाडे देण्याचा यांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज कीर्तन हे केवळ अध्यात्मिक प्रबोधनाचे माध्यम न राहता, सामाजिक आणि पर्यावरणीय संदेश देणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. पद्मभूषण ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक
कीर्तनात पाच वृक्षांची रोपे वाटप" हा अभिनव उपक्रम.
हा उपक्रम राबवित असल्याचे हभप प्रा. पूनम महाराज आजय जाचक (कोलते) यांनी सांगितले.
गुरोळी (ता पुरंदर) येथे स्वर्गीय भगवान खेडेकर यांच्या
पुण्यस्मरणा दिनानिमित्त पुनम महाराज जाचक यांच्या कीर्तनाच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत
होत्या.
पूनम महाराज जाचक पुढे म्हणाल्या आरोग्य हीच खरी संपत्ती आहे सध्या देशात प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नद्यांचे प्रदूषण, शहरांतील ध्वनी व वायू प्रदूषण, तसेच शेतीमध्ये रासायनिक औषधांचा अतिवापर
यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
कोरोना महामारीने ऑक्सिजनचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला समजावले. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य बनले आहे. त्यातूनच पूनम महाराजांनी त्यांच्या कीर्तन सेवेतून वृक्षारोपणाचा संकल्प सुरु केला.
या उपक्रमामध्ये एक भावनिक पैलूही आहे पूनम महाराज म्हणतात या झाडांच्या माध्यमातून आई-वडिलांचे स्मरण जपले जाते विशेषतः मृत व्यक्तींच्या अस्थी नदीमध्ये
विसर्जित न करता, त्या झाडांच्या खड्ड्यात ठेवून त्यावर वृक्षारोपण करण्याची संकल्पना त्यांनी समाजासमोर मांडली असून ती लक्षणीय प्रतिसाद मिळवत आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व सांप्रदायिक विभागाचे अध्यक्ष देवा तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे, असे पूनम महाराजांनी
सांगितले.
धर्म आणि पर्यावरणाचे सुंदर संयोगातूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण कल्याण साधता येते असा विश्वास पूनम महाराज जाचक व्यक्त करतात.
यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी शिक्षणाधकारी
पांडुरंग मेमाणे, शिक्षक नेते अरुण महाडिक सरपंच रेणुका खेडेकर, रामचंद्र खेडेकर, भैय्या गोते, वसंत खेडेकर, अंकुश