आरे बापरे पुरंदरचा बिहार होतोय काय?बिअर बारमध्ये बिलाच्या कारणावरून एकास काठ्यांनी विटेने सहा जणांकडून मारहाण ..
(प्रतिनिधी) द .महाराष्ट्र न्यूज : वीर (ता. पुरंदर) येथील समृद्धी बिअरबार हॉटेलमध्ये बिलाच्या वादातून हॉटेल मालकास सहा जणांच्या टोळीने जमाव जमवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, काठ्यांनी व विटेने जबर मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवड पोलिसांकडून मिळालेले माहितीनुसार,
फिर्यादी सौरभ सुरेश वाघ (वय ३२, व्यवसाय हॉटेल मालक, रा. वीर, ता. पुरंदर) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार
समृद्धी बिअरबार हॉटेलच्या चायनीज किचनमध्ये बिअरचे बिल जास्त लावल्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घातला. त्यानंतर आरोपी दिलीप विलास धुमाळ व अमोल आप्पासो धुमाळ यांनी इतर नातेवाईकांना पाचारण करून फिर्यादीस
दमदाटी करत हाताने, लाथांनी, काठी व विटेने मारहाण केली व गंभीर दुखापत केली.
या प्रकरणी संशयित आरोपी दिलीप विलास धुमाळ, अमोल आप्पासो धुमाळ, कमलेश शिवाजी धुमाळ, संदीप दादासो धुमाळ , सत्यजित प्रतापसिंग धुमाळ, शंभुराज महादेव धुमाळ (सर्व रा. वीर, ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सासवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी. यू. थोरवे हे करीत आहेत.